आयपीएल 2023 चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या लीगपूर्वी प्रत्येक खेळाडू आपल्या तयारीत व्यस्त आहे. त्यात महेंद्रसिंग धोनीच्या नावाचाही समावेश आहे.
अलीकडे, सीएसके संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी चेपॉकमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये एका नवीन अवतारात दिसला. माहीचा हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.
View this post on Instagram
वास्तविक चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी स्टेडियमच्या आत खुर्च्यांवर स्प्रे पेंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, धोनीच्या हातात स्प्रे पेंट आहे आणि तो मनापासून खुर्च्या रंगवताना दिसतोय. माहीचा हाच व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. काही चाहते धोनीला सलाम करत आहेत, तर काही चाहते त्याचा साधेपणा पाहून आणखीच भावूक झाले आहेत.
IPL 2023 हा एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो का?
आयपीएल 2023 च्या संदर्भात मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की, महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. तरी याची अद्यापही पुष्टी झालेली नाही, परंतु या सर्व चर्चाना दुजोरा देत चाहत्यांना या मोसमातही त्याच्याकडून मोठी खेळी पाहण्याची अपेक्षा आहे.