दर महिन्याला भारतीय रिझर्व्ह बँक बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक महत्त्वाचे सण येत आहेत. अशा स्थितीत येत्या महिनाभरात एकूण 15 दिवस बँकांना सुट्या येणार आहेत. बँकांशी संबंधित काही महत्त्वाचे काम असल्यास ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहे.
जर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण करून घेणार असाल तर, एप्रिल महिन्यात येणाऱ्या बँकांच्या सुट्ट्यांची यादी तुम्ही पाहायलाच हवी. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार एप्रिल महिन्यात खासगी आणि सरकारी बँका एकूण 15 दिवस बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 दिवसांच्या सुट्यांमध्ये काही स्थानिक सुट्ट्या आहेत, मात्र काही दिवस संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. चला, पाहूया.
* एप्रिल बँक हॉलिडे लिस्ट 2023
1 एप्रिल 2023 – वार्षिक खाते बंद झाल्यामुळे काही राज्ये वगळता बँका बंद राहतील.
2 एप्रिल 2023 – रविवार
4 एप्रिल 2023 – महावीर जयंती
5 एप्रिल 2023 – बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन
7 एप्रिल 2023 – गुड फ्रायडे
8 एप्रिल 2023 – दुसरा शनिवार
9 एप्रिल 2023 – रविवार
14 एप्रिल 2023 – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / तामिळ नववर्ष दिन / महा बिसुभा संक्रांती / बोहाग बिहू / चेरावबा / बैसाखी / बैसाखी / बिजू उत्सव / बिसू उत्सव
15 एप्रिल 2023 – विशू / बंगाली नववर्ष दिवस / बोहाग बिहू / हिमाचल दिवस
16 एप्रिल 2023 – रविवार
18 एप्रिल 2023 – शब-ए-कदर
21 एप्रिल 2023 – ईद-उल-फित्र (रमजान ईद) / गरिया पूजा / जुमात-उल-विदा
22 एप्रिल 2023 – रमजान ईद (ईद-उल-फित्र), दुसरा शनिवार
23 एप्रिल 2023 – रविवार
30 एप्रिल 2023 – रविवार
जर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे एप्रिल महिन्यात पूर्ण करणार असाल तर एप्रिल महिन्यातील बँकांच्या या सुट्ट्यांची यादी तुम्ही जरूर पहा. अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.