नेवासा (प्रतिनिधी) – न्यायालयात ई-फायलिंग बंधनकारक करण्यात आलेले असतांना किरकोळ अर्जासाठीही त्याचा वापर सुरू झाला आहे. उच्च न्यायालयापेक्षा जिल्हा न्यायालयाचे कामकाज वेगळे आहे. साक्षी व पुरावे तपासले जातांना ई -सुविधेमुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका वकील संघाने नवीन प्रणालीला विरोध दर्शविला आहे.
‘ई -फायलिंग सक्तीचे करण्यात आलेले आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत नेवासा
तालुका वकील बाधंवातून व्यक्त केले जात आहे. स्कॅनर, संगणक, इंटरनेट, पूर्ण वेळ वीजपुरवठा अशा विविध सुविधा ग्रामीण भागात लवकर उपलब्ध होत नाहीत शहरी भागातही तांत्रिक समस्या येतात त्यामुळे नेवासा तालुका वकील संघाने बुधवार (दि.२५) रोजी ई – फायलिंग कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
नेवासा न्यायालयात वकिलांचा ई – फायलिंगच्या विरोधात कामकाजावर बहिस्कार टाकण्यात आला. नेवासा तालुका वकील संघाने घेतलेल्या निर्णयाला सर्व सदस्यांनी एकमत दाखवत दोन दिवस बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी दैनिक प्रभात’शी बोलतांना नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.कैलास कापसे म्हणाले की, काही मोजक्याच ठिकाणी या सर्वसुविधा उपलब्ध आहेत तळागाळातील जनतेसाठी कार्यरत वकील आणि साधारण परिस्थितीतील वकील यांनी ई-फायलिंग कशा पद्धतीने करावे ? असा प्रश्न अनेक वकिल बांधवांना सतावतांना दिसून येतो या कामकाजाच्या मदतीसाठी कोणतीही हेल्पलाइन सेवा लवकर मिळत नाही.
Pune Gramin : धक्कादायक! 500 रु.कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून
सुरळीत असलेली यंत्रणा विस्कळीत करून वकीलांचे तांत्रिक अवलंबित्व एक प्रकार यामुळे वाढविले जात आहे त्यामुळे वकिल व पक्षकारांवर एक प्रकार हा अन्यायच होत आहे. त्यामुळे आम्ही आज बुधवारी व शुक्रवार (दि.२७) रोजी नेवासा न्यायालयात कामकाजावर बहिष्कार टाकणार असून पक्षकार व वकिल बांधवांसाठी ई – फाईलिंगमुळे मनस्ताप वाढत चाललेला आहे असेही यावेळी वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.कैलास कापसे यांनी सांगितले.