ICC World Cup 2023 NZ vs ENG : विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह किवी संघाने विश्वचषक 2019 च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. त्यावेळी विजेतेपदाच्या अंतिम लढतीत सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंड संघाला चौकार-गणनेच्या नियमाच्या आधारे विजयी घोषित केलं गेलं होतं आणि त्यामुळे न्यूझीलंड संघाच्या जेतेपदाचं स्वप्न हुकलं होतं.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. न्यूझीलंडने 36.2 षटकातमध्ये केवळ 1 विकेट गमावत 283 धावा करत हा सामना जिंकला.
Two quickfire hundreds from Rachin Ravindra and Devon Conway helped New Zealand to a comfortable win in the #CWC23 opener 👊#ENGvNZ 📝: https://t.co/9XyPD7lF90 pic.twitter.com/qR6tnjQLGB
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2023
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 283 धावांचा पाठलाग करताना खरेतर न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर विल यंग संघाच्या 10 धावा असताना सॅम कुरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागीदारी केली.
कॉनवेने 121 चेंडूत नाबाद 152 धावा केल्या. रचिनने 96 चेंडूत 123 धावा केल्या. कॉनवेने आपल्या खेळीत 19 चौकार आणि तीन षटकार मारले. तर रचिनने 11 चौकार आणि पाच षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम करनने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, ज्यो रुटची अर्धशतकी खेळी तर जोस बटलरने केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 282 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकत इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. इंग्लंडच्या प्रमुख फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत होते. ज्यो रुटने एक बाजू सांभाळताना दमदार अर्धशतक फटकावले.
Nobody has ever done this before in an ODI 👀
England’s total of 282/9 was historic in at least one way ⬇️https://t.co/YvOSNWjux4
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 5, 2023
मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 77 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 86 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 1 षटकार फटकावला. त्यानंतर संघाचा डाव सावरताना बटलरने 43 धावांची खेळी करताना 42 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर तळातील फलंदाजांनी थोडीफार चमक दाखवताना इंग्लंडला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने 3 गडी बाद केले. ग्लेन फिलिप्स व मिचेल सॅंटनर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.