देशात 8 नवीन खाजगी बँका उघडणार?

रिझर्व बँकेकडे परवान्यासाठी अर्ज सादर

नवी दिल्ली – देशात येणााऱ्या काळात देश विदेशातील कंपन्याकंडून 8 नवीन खाजगी बँका उघडण्याच्या तयारीत आहे. त्याकरीता संबंधित कंपन्यांनी भारतीय रिझर्व बँकला ‘ऑन टॅप’ परवानगी मागतली आहे. आरबीआयनेसांगितले की, ‘ऑन टॅप’ मार्गदर्शक सुचनांनुसार परवानगी साठी 4-4 आवेदन प्राप्त झाली आहे. मार्गदर्शक सुचनानुसार यूनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकला परवानगी देण्यात येणार आहे. संबंधित आवेदनामध्ये देशी आणि विदेशातील कंपन्यां आणि व्यक्तींचा समावेश आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, यूनिव्हर्सल बँक परवान्यासाठी यूएई एक्सचेंज आणि फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, द रॅप्टरीज को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक लिमिटेड (आरईपीसीओ बँक), चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड आणि पंकज आणि इतरांनी युनिव्हर्सल बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केले आहे. यामध्ये फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांचा चैतन्य भारतात मोठा वाटा आहे. सचिन बन्सल यांनी सप्टेंबर 2019 मध्ये चैतन्यमध्ये 739 कोटींची गुंतवणूक केली.

स्मॉल फायनान्स बँकेच्या परवान्यासाठी व्ही सॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅलिकट सिटी सर्व्हिस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अखिल कुमार गुप्ता आणि रिजनल रूरल फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी आवदेन सादर केले. आरबीआयने 1 ऑगस्ट 2016 आणि 5 डिसेंबर 2019 रोजी खासगी क्षेत्रातील युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँकेच्या ऑन टॅप परवान्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते.

छोट्या फायनान्स बँक सुरू करण्यासाठी आरबीआय एक परवाना देते. त्यानुसार टॅपवर म्हणजे आरबीआयने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांची पूर्तता करणारी कोणतीही संस्था स्मॉल फायनान्स बँकेकडून परवाना घेऊ शकते. याकरीता अंतर्गत अतिरिक्त मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे ऑन टॅप परवान्यासाठी अर्ज सादर करणाऱ्यांना बँकिंग किंवा वित्तीय क्षेत्राचे ज्ञान असले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.