‘अशी’ आहे व्हाइट हाउसमधील नवीन फर्स्ट फॅमिली; जाणून घ्या

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन विजयी झाले आहे. निवडणुकीच्या वेळी प्रमुख उमेदवारांसोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडेही नागरिकांचे आणि प्रसार माध्यमांचे लक्ष असते. बायडेन यांच्या प्रचार अभियानात त्यांच्या कुटुंबातले सदस्यही असेच प्रकाशझोतात होते.

आता बुधवारी बायडेन अधिकृतपणे व्हाइट हाउसचे निवासी होणार असल्यामुळे त्यांच्यासोबत कोण कोण येथे वास्तव्याला येणार आणि ते बायडेन यांचे कोण आहेत व सध्या काय करतात याची माहिती तपशीलाने दिली गेली आहे.

बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन या इंग्रजीच्या प्राध्यापक असून त्यांनी डॉक्‍टरेट मिळवली आहे. त्यांच्याकडे एकूण चार पदव्या आहेत. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्या ज्ञानदानाच्या क्षेत्रातही काम करतात.

अमेरिकेच्या इतिहासात जिल यांच्या नावाची वेगळीच नोंद होणार आहे. ती म्हणजे फर्स्ट लेडी या मोठ्या पदावर असतानाही त्या बाहेर जाउन नौकरी करणार असून पगारही घेणार आहेत. जिल बायडेन त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये डॉक्‍टर बी या नावाने प्रसिध्द आहेत.

बायडेन यांना पहिल्या पत्नीपासून हंटर व ब्यू ही दोन मुले तर एक कन्या आहे. यातील कन्या आणि ब्यू यांचे निधन झाले आहे. दुसऱ्या पत्नीपासून ऍश्‍ले नामक कन्या आहे. ब्यू बायडेन यांचा ब्रेन कॅन्सरने 2015 मध्ये मृत्यू झाला आहे.

तर हंटर लष्करात होते. मात्र नशाखोरीच्या आरोपावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची सगळ्यांत लहान कन्या ऍश्‍ले सोशल वर्कर असून हंटर आणि ऍश्‍लेही बायडेन यांच्यासह व्हाइट हाउसचे निवासी होणार आहेत. बायडेन यांच्या पहिल्या पत्नीचा म्हणजे हंटरच्या आईचा आणि बहिणीचा अपघातात मृत्यू झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.