देशभरात करोना स्थिती गंभीर झाल्याने नेट परीक्षाही लांबणीवर

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात “नेट’ परीक्षेला देखील करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 2 मे ते 17 मे दरम्यान देशभर होणार होती.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरात नेट परीक्षा घेतली जाते. प्राध्यापक होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असल्याने देशभरातील लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित ऑनलाइन पद्धतीने होत असून, त्याचा तारखा “एनटीए’ने जाहीर केल्या आहेत. 80 विषयांसाठी नेट परीक्षा 2 ते 17 मे या कालावधीत होणार होती. 

या परीक्षेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, त्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे “एनटीए’कडून आता परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली होती.

करोनाचा संसर्ग वाढल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्याने कठोर निर्बंध घातले आहेत. महाराष्ट्र सरकारने एमपीएससी, वैद्यकीय परीक्षा आणि दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्र सरकारने सीबीएसई, आयसीएसई, पदव्युत्तरच्या वैद्यकीय परीक्षा, जेईई मेन्स परीक्षा लांबणीवर टाकली आहे. मात्र नेट बद्दल निर्णय घेण्यात आलेला नव्हता.

देशभरात स्थिती गंभीर झाल्याने नेट परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यानुसार एनटीएने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजिन तारीख 15 दिवस आधी कळवली जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.