काठमांडू – नेपाळमध्ये पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दुर्घटनाग्रस्त झालेल्या यति एअरलाईन्सच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. घटनास्थळीच हा ब्लॅक बॉक्स सापडला असून नेपाळच्या नागरी हवाई वाहतुक प्राधिकरणाकडे सोपवण्यात आला आहे, असे यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बारतौला यांनी सांगितले.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डर सोमवारीच सापडला होता. बचाव आणि मदत कार्यासाठी बचाव पथकाचे कर्मचारी 300 मीटर खोल दरीत उतरले होते. त्यांना हा रेकॉर्डर सापडला होता.
या विमानातील चार प्रवाशांचा शोध अजून लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठीचे प्रयत्न जोरात सुरू करण्यात आले आहेत. रविवारी यति एअरलाईन्सचे 72 प्रवासी असलेले प्रवासी विमान नव्याने उद्घाटन झालेल्या पोखरा विमानतळावर उतरत असताना दरीतल्या नदीत कोसळले होते.
खळबळजनक! वरिष्ठ वकिलाची उच्च न्यायालयातच 6 गोळ्या घालून हत्या
यामध्ये विमानातील किमान 68 प्रवासी ठार झाले आहेत. नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षातील हा सर्वाधिक भीषण विमान अपघात होता.