मुंबई- ‘U ARE MINE’ म्हणत गायिका नेहा कक्करने सोशल मीडियावर रिलेशनशिपबद्दलचा खुलासा केला आहे. खरंतर मागील व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी नेहा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. मात्र ती फोल ठरली.
मागील काही दिवसांपासून सिंगर नेहा कक्कर तिच्या रिलेशनशिपमुळे सतत चर्चेत होती. अखेर तिने आपल्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. नेहा पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंहसोबत ( रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांच्या नावाची मोठी चर्चा होती. अखेर या चर्चा आता खऱ्या ठरल्या असून, नेहाने बॉयफ्रेंड रोहनप्रीतसह एक फोटो शेअर करत, त्यांच्या नात्याचा खुलासा केला आहे.
नेहा आणि रोहनप्रीत दोघांनीही सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत, ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे. या दोघांच्या फोटोवरही अनेक चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.