नांदेड(प्रतिनिधी) – भारतीय आर्युविज्ञान परिषदेने नांदेडसह सहा जिल्ह्यात २४ ऑगस्ट ते ०३ सप्टेंबर दरम्यान आयसीएमआर सिरो सर्वे केला होता. यात नांदेड जिल्ह्यातील ४३९ जणांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी ४३ जणांचे नमुने कोरोना होऊन गेल्याचे आढळून आले होते. यामुळे नांदेड जिल्ह्यातील सिरो सर्वेक्षणाची टक्केवारी ९.८ दाखविण्यात आली.
यानुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाख गृहीत धरल्यानंतर ९.८ टक्क्या नुसार ३ लाख ६७३ जणांना कोरोना होऊन गेल्याचे म्हटले आहे.
जेव्हा, की कोरोना बाधितांची ऑन रेकॉर्ड नोंद साडेसोळा हजार आहे, म्हणजे तब्बल ०२ लाख ८४ हजार ४१ जणांना कोरोना होऊन गेल्याचे कळले सुद्धा नाही ही धक्कादायक वस्तुस्थिती पुढे आल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.