मुंबई – हडपसरमध्ये रस्त्याकडेला डोंबारी खेळातून काठी-दांडपट्ट्याचा खेळ करणाऱ्या 85 वर्षांच्या आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला. यावेळी या व्हिडियोतील आजीचे सोशलसह, अनेक सेलेब्स, राजकीय नेत्यांनी खूप कौतुक केले.
या आजीच्या मदतीसाठी अनेक हातही पुढे आले. अभिनेता रितेश देशमुख , राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कसरतपटू आजी शांता बाळू पवार यांची गोसावीवस्ती येथे भेट घेत साडीचोळीसह एक लाख रुपयांची मदत दिली होती.
View this post on Instagram
यातच या वॉरिअर आजींनी ‘इंडियन आयडॉल १२’ च्या मंचावर हजेरी लावली होती. यादरम्यान वयाच्या ८५ व्या वर्षी या आजींचा असलेला उत्साह आणि इतरांसाठी करत असलेली मेहनत पाहून नेहाने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील या आजी १० अनाथ मुलींचा सांभाळ करतात. त्यामुळे त्यांच्या या कार्याला सालाम करत नेहाने त्यांना १ लाख रुपयांची मदत केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शांताबाई पवार यांनी सांगितले की, ‘मी दहा अनाथ मुलांची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळत आहे. माझा नातू बारावी उत्तीर्ण झाला असून, त्याची फी भरता न आल्याने त्याचे पुढील शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत मला होती. शांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षापासून डोंबारी खेळ करायला सुरुवात केली. लग्न होईपर्यंत आई-वडिलांसोबत त्यांनी खूप ठिकाणी डोंबारी खेळ केले.
लग्नानंतर त्यांनी खेळ करणे बंद केले. मात्र, काही दिवसातच पतीचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी शांताबाईंवर आली. त्यातूनच पुन्हा त्यांनी डोंबारी खेळ सुरू केला. त्या जागोजागी साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर करून मिळालेल्या पैशातून घरखर्च भागवीत आहेत.
उतारवयात देखील त्या शहरात व विविध गावात खेळ सादर करत आहेत.शांताबाई केवळ दुसरी शिकलेल्या आहेत. त्या लेझीम आणि दांडपट्टा, असे खेळही सादर करतात. आत्मविश्वास आणि ऊर्जा असेल, तर आयुष्यात आपण खूप काही करू शकतो, हे शांताबाईंचा जीवन प्रवासातून समजते.’