गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार विवाहबंधनात अडकले आहेत. हे सेलिब्रिटी कपल त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. मात्र अभिनेत्री गौहर खानने वयाच्या अंतराचा झैद बरोबरच्या आपल्या नात्यावर कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
View this post on Instagram
अखेर आज, २५ डिसेंबर रोजी या दोघांचा निकाह पार पडला आहे. निकाहपूर्वी रंगलेल्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
View this post on Instagram
हळदी समारंभापासून ते मेहंदी समारंभापर्यंत प्रत्येक सोहळा या दोघांनी धुमधडाक्यात सेलिब्रेट केला असून तो एन्जॉय केल्याचं पाहायला मिळालं.
View this post on Instagram
खास ख्रिसमसचं निमित्त साधत या दोघांनी निकाह केला आहे. गौहर आणि झैदचा निकाह झाल्यानंतर त्यांच्या या खास क्षणाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निकाहच्या वेळी गौहरने पांढऱ्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. या कपड्यांवर सोनेरी रंगाच्या बॉर्डरने खास डिझाइन करण्यात आली होती.
View this post on Instagram
छोटा पडदा गाजवणारी गौहर खान बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती असून, झैद कोरिओग्राफर आहे. तर झैद गायक, संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. दोघेही सोशल मीडियावर आपल्या नात्यासंबधी चाहत्यांना माहिती देत असतात. चाहतेही या सुंदर जोडीच्या नवनवीन पोस्टसच्या प्रतीक्षेत असतात. यातच सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून लाखोंच्या घरात या फोटोला लाईक मिळाले आहे.