विश्रांतवाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आमदार सुनील टिंगरे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेमधील भोंगळ कारभार, अनियमतिता, ४ हजार ५०० कोटींच्या भष्ट्राचाराच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले.
पुणे- नगर रस्त्यावरील विमाननगर चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनप्रसंगी मतदारसंघातील आजी -माजी नगरसेवक, सेलचे अध्यक्ष, विधानसभा कार्यकारिणी, प्रभाग अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.