पुणे – मार्गशीर्ष दर्श अमावस्या म्हणजेच 26 डिसेंबर 2019 तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजेच 2010 सालानंतर कंकणाकृति सूर्यग्रहण आज नागरिकांना दिसले. जास्तीत-जास्त ठिकाणी खंडग्रास आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये कंकणाकृती सूर्य ग्रहण दिसले. भारतामध्ये ग्रहणाचा कालावधी २.५२ तासांचा होता. सकाळी ९:३० वाजता मध्य काळ आणि सकाळी १०:५६ वाजता ग्रहण संपले.