सातारा : जिल्हा परिषदेच्या कुडाळ (ता. जावळी) गटातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
या पोटनिवडणुकीसाठी काल गुरुवारी ४४ टक्के मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक पवार यांना ९९२३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांना केवळ ४४३४ मते मिळाली. दीपक पवार ५४८९ मताधिक्याने विजयी झाले.
भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या निकालाने धक्का दिला आहे. त्यांनी मालोजी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. माजी आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी दीपक पवार यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती.