पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आता त्यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले जात आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी पक्ष आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. 6 मार्च रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा आहे. त्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या दिवशीच संपूर्ण शहरात “मोदी गो बॅक’ हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.