नवी दिल्ली – राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. देशमुख यांना, कथित १०० कोटी वसुली प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबाजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने अनिल देशमुखांना दिलेल्या जामिनाला विरोध केला होता. ( Anil Deshmukh Bail Granted )
ईडीने देशमुखांच्या जामिनाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनिल देशमुखांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
SC refuses to interfere with the Bombay High Court’s order granting bail to Maharashtra’s former HM & NCP leader Anil Deshmukh, who was arrested in connection with a money laundering case. ED had moved the Supreme Court to challenge the bail granted to Deshmukh by the High Court. pic.twitter.com/mljKsz3xCN
— ANI (@ANI) October 11, 2022
गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात अटकेत आहेत. देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुलीचे आरोप लगावले होते. यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यवा लागला होता. ( Anil Deshmukh Bail Granted )