नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली  – नवोदय विद्यालय समितीने इयत्ता सहावीच्या वर्गासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकली आहे. एनव्हीएसटी प्रवेश परीक्षा मिझोरम, मेघालय आणि नागालॅंड वगळता इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 16 मे रोजी होणार होती. तर या तीन राज्यांमध्ये 19 जून 2021 रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र, वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवोदय विद्यालय समितीतकडून इयत्ता सहावीच्या वर्गासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीच्या वर्गासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021 ची नवीन तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवीन तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 15 दिवसांची मुदत मिळेल, असा वेळ ठेवून तारीख जाहीर होईल. करोना विषाणू संसर्ग आणि प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याची माहिती, जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.