Double Mask | डबल मास्कमुळे करोनापासून दुहेरी संरक्षण पण…

अमेरिकेतील संशोधनात सिद्ध

न्यूयॉर्क – चेहऱ्यावर दुहेरी मुखपट्टी वापरल्याने नाकातोंडात सार्स करोना 2 च्या आकाराचे घटक जाण्यापासून रोखण्यासाठी दुप्पट संरक्षण मिळते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. मात्र, सैल असणाऱ्या दुहेरी मास्कपेक्षा फिट बसणाऱ्या एकाच मास्कने अधिक संरक्षण मिळत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

तुम्ही विषाणू टाळण्यासाठी कापडाचे स्तर वाढवले आणि त्यात अंतर असेल किंवा त्याचे फिटींग योग्य नसेल तर त्याचा फारसा लाभ होत नसल्याचे जामा इंटर्नल मेडिसीनच्या अहवालात म्हटले आहे. या अभ्यासाचे प्रमुख आणि नॉर्थ कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक इमिली सिकबर्ट-बेनेट म्हणाल्या, वैद्यकीय प्रक्रियेतील मास्कमध्ये हवेच्या गाळपाची प्रक्रिया उत्तम पद्धतीने होते. मात्र, ते आपल्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीने बसतात ती प्रक्रिया योग्य नाही.

यूएसपीए ह्यूमन स्टडीज फॅसिलिटीमध्ये फिट बसलेल्या मास्कच्या गाळप क्षमतेची चाचणी जेम्स समेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली. त्यात त्यांनी 10 फूट बाय 10 फूट आकाराच्या स्टिल चेंबर्समध्ये मिठाचे स्प्रेमध्ये फवारता येतील, असे कण भरले. त्यानंतर त्यांनी या कणांना आपल्या श्‍वसन प्रकियेपासून मास्क कसे दूर ठेवतात याचे परीक्षण केले.

श्‍वसनात आलेल्या या कणांचे प्रमाण आणि चेंबरधील त्याचे प्रमाण याची सांगड घालून योग्य फिट मास्कची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी घेताना आम्ही चेंबरमध्ये माणसाला कराव्या लागणाऱ्या नित्य हालचाली करायला लावल्या. जसे की कंबरतून वाकणे, बोलणे, वर-खाली, डाव्या-उजव्या बाजूला पाहायला लावणे, असे यूएनसी स्कूल ऑफ मेडिसीनचे फिलीप क्‍लॅप यांनी सांगितले.

माणसागणिक मास्कची परिणामकारकता
या संशोधनात योग्य गाळप क्षमतेच्या वैद्यकीय मास्कची परिणामकारकता व्यक्तीगणिक वेगळी होती. त्याचे कारण मुख्यत्वे करून प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यात असणाऱ्या फरकात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मास्क जर ते फिट बसण्यासाठी योग्य अल्टर केले नाहीत तर करोनाच्या विषाणूला रोखण्याची त्यांची क्षमता 40 ते 60 टक्के असते. तर कापडी मास्कची क्षमता 40 टक्के असते.

कापडी मास्कवर जर पुन्हा एखादे कापडाच्या आवरणाने झाकल्यास ती फिट बसून आणि त्यातील अंतर कमी होऊन त्याची क्षमता कैक पटीने वाढते, त्यामुळे नाक आणि तोंड योग्य स्वरूपात बंद राहते. मात्र, दोन लूज बसणारे मास्क वापरून मिळणाऱ्या संरक्षणापेक्षा एक योग्य फिट बसलेल्या मास्कने अधिक संरक्षण मिळते, असेही सिकबर्ट बेनेट यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.