नवी दिल्ली: 9 नोव्हेंबर रोजी कर्तारपूर कॉरिडोरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तानने कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना आमंत्रित केले आहे. नवजोतसिंग सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनाला जाण्यास परवानगी मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता. दरम्यान,सिद्धू यांची विनंती मान्य करण्यात आली आहे.
एनएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृतानुसार 9 नोव्हेंबरला करतारपूर साहिब कॉरिडोरच्या उद्घाटनाला जाण्यास नवज्योतसिंग सिद्धू यांना राजकीय मंजुरी देण्यात आली आहे.
सिद्धू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना दोन पत्र लिहले होते. पहिल्या पत्राला उत्तर न मिळाल्याने त्यांनी दुसरे पत्र लिहले. त्यामध्ये “शासनाने मला उद्घाटनासाठी पाकला जाण्याची परवानगी दिली आहे की नाही याविषयी वारंवार आठवण करून देऊनही तुम्ही प्रतिसाद दिला नाही”, असे म्हटले होते.
Sources: Political clearance has been granted to Congress leader Navjot Singh Sidhu to travel through the Kartarpur Sahib Corridor on 9th November. pic.twitter.com/vVfQexF5hz
— ANI (@ANI) November 7, 2019