पुणे :-महाराष्ट्रीय मंडळ, ब्लाईंड क्रिकेट संघटना आणि पुणे पुरूष ब्लाईंड संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्लाईंड क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आणि गोवा या संघांनी आपापल्या गटामध्ये गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थान मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात अरींदम मोंडल याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पश्चिम बंगाल संघाने कर्नाटक संघाचा ८ गडी राखून सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कर्नाटक संघाने १६१ धावा धावफलकावर लावल्या.
रवि बंदीवादर याने ६१ धावांची आणि योगेश जे. याने ४९ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. हे आव्हान पश्चिम बंगाल संघाने १६.२ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. अरींदम मोंडल याने ६० चेंडूत १५ चौकारांसह नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याला राहूल सोरेन (नाबाद २६ धावा) याने उत्तम साथ दिली. या दोघांंनी तिसर्या गड्यासाठी ६२ चेंडूत ११२ धावांची भागिदारी केली आणि संघाचा विजय साकार केला.
आफताब पटेल याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गोवा संघाने यजमान महाराष्ट्र संघाचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्र संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९४ धावांचा डोंगर उभा केला. गौरव झडे याने ४८ चेंडूत ११ चौकारांसह ८१ धावांची खेळी केली. आशितोष माव्हसकर याने ४४ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. हे लक्ष्य गोवा संघाने १९.४ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले.
Australian Open 2024 : बोपण्णा-एब्डेन विक्रमापासून फक्त एक पाऊल दूर…
आफताब पटेल याने ५२ धावांची खेळी केली. याशिवाय निलेश एम. (४६ धावा), मायरॉन फर्नांडिस (२६ धावा) आणि साईनाथ जी. (२६ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजयी पथावर नेले. दुसर्या गड्यासाठी आफताब आणि निलेश यांंनी ६४ चेंडूत १०५ धावांची भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला.