बंगळुरू – राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय याचे अपघाती निधन झालं आहे. १२ जून रोजी मित्राच्या घरून परतत असताना विजयचा अपघात झाला होता.
अपघातानंतर विजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र विजयची प्रकृती गंभीर होती. आजअखेर त्याची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज संपुष्टात आली. त्याने आज रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सविस्तर माहिती अशी की, विजय १२ जून रोजी आपल्या मित्राच्या घरून परतत होता. त्याचवेळी विजयच्या बाईकला अपघात झाला. या अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज विजयचा ब्रेन डेड असल्याची घोषणा डॉक्टरांनी केली होती.
दरम्यान विजयवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे डॉक्टरांनी म्हटलं होतं. मात्र विजयची प्राणज्योत मावळली. विजयच्या कुटुंबियांनी विजयचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.