केरळच्या ननला ख्रिश्‍चनांचे संतपद बहाल

व्हॅटिकन सिटी- केरळमधील ख्रिश्‍चन धर्म प्रसारक भिक्षुणी मरियम थ्रेसिया यांना आज संतपद बहाल करण्यात आले. व्हॅटिकन सिटीमध्ये झालेल्या एका भव्य समारंभात ख्रिश्‍चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मरियम थ्रेसिया आणि अन्य चौघांना संतपद बहाल केले. मरियम थ्रेसिया यांनी मे 1914 मध्ये त्रिशूर येथे पवित्र परिवारातील भगिनींच्या परिषदेची स्थापना केली होती. सेंट पीटर स्क्वेअर येथे झालेल्या समारंभाच्या वेळी मरियम थ्रेसिया यांना शतकभर जुन्या संस्थेतील उच्च स्थान देण्यात आले.

मरियम थ्रेसिया यांना आयुष्याच्या पूर्वार्धात 3 मे 1876 रोजी बाप्तिस्म्यावर थ्रेसिया हे नाव देण्यात आले होते. मात्र 1904 पासून त्यांनी आपल्या नावापुढे मरियम हे नाव जोडले. मदर मेरीने दृष्टांत देऊन मरियम जोडण्यास सांगितले असल्याचे त्या मानत.

इंग्लंडचे कार्डिनल जॉन हेनरी न्यूमॅन, स्वित्झर्लंडमधील सर्वसामान्य महिला मार्गूरीट बेस, ब्राझीलच्या सिस्टर डल्से लोपेस आणि इटालियन सिस्टर ज्युसेप्पीना वॅनीनी यांनाही या समारंभात संतपद बहाल करण्यात आले. या समारंभात एक लॅटिन स्तोत्र व संतांच्या मंडळाच्या प्रतिनिधीने दिलेली शिफारसीचा समावेश होता. या सोहळ्यादरम्यान पाच नवीन संतांची विशाल पोट्रेटस संत पीटर बॅसिलिका येथे लावण्यात आली होती, समारंभात हजारो भाविक उपस्थित होते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ या सोहळ्यात सहभागी झाले होते.

केरळमधील शतकानुशतके जुनी सिरो-मलबार चर्चमध्ये आता चार संत आहेत, त्यापैकी पहिले सिस्टर अल्फोन्सा यांना 2008 मध्ये संत घोषित केले गेले होते. चवारा अचेन म्हणून ओळखले जाणारे फादर कुरियाकोसे इलियास चवारा, आणि इव्हुप्रसिअम्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्टर युफ्रेसिया, यांना पोप यांनी 2014 मध्ये संत घोषित केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)