नाशिक : शहरातील महात्मानगर परिसरातील एका व्यापारी संकुलास भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या व्यापारी संकुलात असणाऱ्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला ही भीषण आग लागली आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग अटोकाय आणायचे काम सुरु आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेले नाही.