नारायण राणे 1 सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार ‘नारायण राणे’ आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश व नितेश हे सुद्धा 1 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपप्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.

भाजपमधल्या प्रवेशानंतर नारायण राणे अधिकृत आणि औपचारिकरित्या भाजपवासी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)