मुंबई – करिना कपूर ही बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या करिना आपल्या कुटुंबासमवेत लंडनमध्ये आहे. मात्र, अशातच देशातील प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नारायण मूर्ती यांनी करिनाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नारायण मूर्ती म्हणतात की, “मी लंडनवरुन भारतात येत होतो. त्यावेळी माझ्या शेजारच्या एका सीटवर करिना देखील बसली होती. तिला पाहून अनेक प्रवासी तिच्याकडे येत होते, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. मात्र ती कुणाकडे काहीच लक्ष देत नव्हती. तिने कुणालाही उत्तरही दिले नव्हते. हे पाहून मला खूप वाईट वाटले.”
लोकं मला पाहून देखील माझ्याशी बोलण्यासाठी येत होते. मी त्यांच्याशी उभे राहून बोलत होतो. मी अनेकांना एक ते अर्धा मिनिटं वेळ दिला. पण कुणाला नाराज केले नाही. पण करिनाचे ते वागणे मला आवडले नाही, असे नारायम मूर्ती व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येत आहेत. एकंदरीत त्यांनी करिनाच्या वागणूकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र, हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांचा आहे. तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. यावेळी नारायण मूर्ती यांनी करिनाच्या त्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर त्यांची पत्नी प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी करिनाची बाजू घेतली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुधा मूर्ती यांनी करिनाची बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेटकऱ्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, करिना गेल्या महिनाभरापासून लंडनमध्ये आहे. करिनाने येथील काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.