लोणावळा, (वार्ताहर) – माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या पुढाकारातून लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्ड नाव नोंदणी अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला.
लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय शिबीरात तब्बल 1150 जणांनी आयुष्यमान भारत कार्ड साठी ऑनलाइन पध्दतीने आपली नोंदणी केली. भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरातील सर्व लाभार्थ्यांना लगेचच नोंदणी झालेले कार्ड प्रिंट करून सुपूर्द करण्यात आले.
7 आणि 8 मार्च अशा दोन दिवस चाललेल्या या अभियानासाठी शुभम मानकामे, श्रवण चिकणे, शुभम दाभाडे, पियुष हरिश्चंद्रे, बाबू संपत, चिमन उर्फ अशोक अगरवाल, चैतन्य दळवी, अजय पारख, समिर इंगळे, योगिता कोकरे, श्रद्धा बेदरकर, सुप्रीया देशपांडे यांनी विषेश परिश्रम घेतले.
या अभियानादरम्यान माजी नगरसेवक देविदास कडू, विशाल पाडाळे, कार्याध्यक्ष सुधीर पारिठे, युवा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर, हर्षल होगले, अर्जुन पाठारे, जयप्रकाश परदेशी, हेमंत कांबळे, दीपक कांबळे, संतोष जंगले, शैलेश कचरे यांच्यासह मान्यवरांनी भेट देत उपक्रमाला सहकार्य केले.