दाक्षिणात्य चित्रपटातून करणार कमबॅक
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तनूश्री दत्ताने नाना पाटेक यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत #MeToo मोहिमेला सुरुवात केली होती. तनूश्रीने लावलेल्या आरोपांमुळे नाना पाटेकरांची हाऊसफुल 4 चित्रपटातून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ नाना चंदेरी दुनियेपासून दूर राहिले होते.
आता चाहत्यांना खूश करण्यासाठी नाना पाटेकर एक नव्या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट एक तमिळ थ्रीलर असणार आहे. या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नाना पाटेकरांनी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी होकार कळवला असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बेबीचित्रपटाचा तमिळ रिमेक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबत दाक्षिणात्य अभिनेता जयम रावीदेखील झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
नाना पाटेकरांचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेला काला हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला होता. मात्र हिट ठरलेल्या या चित्रपटानंतर नाना बराच काळ चित्रपटसृष्टीपासूव लांब होते. आता पुन्हा एकदा तमिळ चित्रपटाच्या माध्यमातून नाना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.