नेवासा – माजी खासदार स्व.तुकाराम पाटील गडाख (भाऊ) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पानसवाडी येथील गडाख वस्तीवर गुरुवार दि.१४ ते बुधवार, दि.२० या कालावधीत भागवताचार्य पोपट महाराज यावलकर यांची सकाळी ८ ते ११ व सांयकाळी ५ ते ८ या दरम्यान श्रीमदभागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (दि.२१) सकाळी १० ते १२ या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवा नेते रविराज पाटील गडाख यांनी केले आहे.
राजकारणातील तुफानी व्यक्तीमत्व व एक धाडसी नेतृत्व असलेला नेता म्हणून जिल्ह्यात माजी खासदार तुकाराम गडाख यांची ओळख होती. सर्वसामान्य व जिव्हाळ्यांच्या कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारा नेता व कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम व आपुलकी असलेल्या या धाडसी नेत्याचे गेल्यावर्षी आकस्मित निधन झाले.
त्यांची तासूभरही उणीव कार्यकर्त्यांना भासू न देणारे व त्यांचा वारसा चालविणारे त्यांचे बंधू पेशवे किसनराव पाटील गडाख व सुपूञ रविराज पाटील गडाख हे चालवत आहेत. पानसवाडी येथील गडाख वस्तीवर होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रविराज पाटील गडाख यांनी केले आहे आहे.