९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक् गुन्हे शाखेची कारवाई
नगर – भिंगार येथील भूईकोट किल्ला परिसरात सोन साखळी चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुर्हानगर परिसरातून १७ ग्रॅम वजनाच्या दागिन्यासह जेरबंद केला आहे.
सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४, रा. सांजा रोड, जाळी कारखान्या समोर, धाराशिव मुळ रा. कासीम बर्ही दर्गा, पढेगांव, जिल्हा संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत धनश्री नंदकुमार सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस् ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख याने केला आहे. व तो सध्या नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून बुर्हानगरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमला पंचासमक्ष ताब्यात घेतला.
पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सपोनि हेमंत थोरात, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरंदले, फुरकान शेख, अरुण मोरे व अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.