नगर – नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणनारे सराईत दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने २ गावठी कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस हे करत आहेत.
किशोर तुकाराम माळी (वय 30, रा. लोहारवाडी, ता. नेवासा), कृष्णा येलप्पा फुलमाळी (वय 33, रा. घोडेगांव, ता. नेवासा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आकाश अनिल फुलमाळी (रा. घोडेगाव) हा फरार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेतली असता 60 हजार रुपये किमतीचे २ गावठी कट्टे, 1 हजार 500 रुपयांचे 3 जिवंत काडतुसे असा एकुण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर गावठी कट्टे व काडतुसे कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता गणेश साबळे (रा. सोनई ता. नेवासा) यांचेकडुन विक्री करणे करता आणल्याचे सांगितले. यातील कृष्णा फुलमाळी हा सराईत गुन्हेगार असून त्यावर विविध पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, संतोष खैरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ व अरुण मोरे यांचे पथकाने केली.