नवी दिल्ली – भारतात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने बाई, बुब्स आणि ब्रा याविषयी सडेतोड भूमिका मांडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे ताजं असतानाच आता हॉलिवूड अभिनेत्री गिलीयन अँडरसन हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
यापुढे मी कधीही ब्रा वापरणार नाही, अशी घोषणा गिलियन हिने आपल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये केली. तिचे इंस्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.
गिलीयनने म्हटलं की, मी कधीही ब्रा वापरणार नाही. त्यासाठी क्षमा करा. भलेही माझे स्तन बेंबीपर्यंत आले तरी चालेल, मी त्याची काळजी करत नाही. मात्र मी कधीही ब्रा वापरणार नाही, असंही गिलीयन आपल्या चाहत्यांशी बोलताना म्हणाली. आपल्या लिव्हिंग रुममधून ती कॅमेऱ्यासमोर बोलत होती.
गिलीयन हिच असं बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, दोन वेळा गोल्डन ग्लोब अवार्ड विजेती आणि ऐमी अवॉर्ड विजेत्या गिलीयन एंडरसनला असं वाटत असेल तर त्याच्याशी कोणी असहमत असण्याचं कारण नाही