पुणे – अमरावती जिल्ह्यातील पुर्णा याठिकाणी सासूचा खून करून पसार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी पुण्यातील येरवडा येथून अटक केली. अमरावतीतून ट्रॅव्हल्सने येरवडा येथे उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. दिनेश भानुदास भोरखडे (, रा. पेठईतबारपुर, ता. दर्यापुर, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, रुकमा विनायक इंगळे असे मयत सासूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा पुर्णा याठिकाणी शुक्रवारी (दि.) खूनाची घटना घडली होती. आरोपी भोरखडे याची पत्नी टाकरखेड पुर्णा याठिकाणी तिच्या माहेरी आली होती. मात्र, सासनूे तिला पुन्हा सासरी पाठविण्यास नकार दिला. यातून झालेल्या वादावादीतून भोरखडे याने सासूवर कुऱ्हाडीने हल्ला करून खून केला. याबाबत अमरावतीतील पुर्णा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. या दरम्यान आरोपी भोरखडे हा ट्रॅव्हल्सने पुण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती.
यानूसार सापळा रचून भोरखडे याला शनिवारी सकाळी येरवडा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलकीस फौजदार अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, उमेश धेंडे, सचिन जाधव, अंकुश जोगदंड, रुपेश पिसाळ, विनोद महाजन नाना कर्चे यांच्या पथकाने केली.