इडुक्की (केरळ) – येथील एसएफआय संघटनेच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी युवक कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. निखिील पैली, आणि जिरीन जिओ अशी अटक केलेल्या दोन कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नावे आहेत.
त्यांनी धीरज राजेंद्रन नावाच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या केली असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात केरळ स्टुडंट युनियनचा नेते ऍलेक्स राफेल यालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक आर करूपस्वामी यांनी सांगितले की या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करावी लागणार असून आम्ही या व्यापक कटाची पाळेमुळे खणून काढणार आहोत.
इडुक्की इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात हा हल्ला झाला आहे. त्यात अन्य दोन विद्यार्थि कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.