बारामती, (प्रतिनिधी)- १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जोपासणाऱ्या बारामतीची प्रसिद्ध सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड यांनी मातृदिन व परिचारिका दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. यावेळी कार्यकर्तृत्वाची छाप बारामती आणि पुणे जिल्हा परिसरात उमटविणाऱ्या व्यक्तींच्या मातांचा सन्मान मातृदिनानिमित्त करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याने सत्कार मूर्ती भारावून गेले होते.
चार पिढ्यांचे ऋणानुबंध जपणाऱ्या चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आईचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले असल्याचे मत दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे यांनी व्यक्त केले.
सेल्स हेड दीपक वाबळे, मार्केटिंग विभागाचे कुलदीप बावणे, कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, नवनाथ गिऱ्हे, कुलदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन निवेदक धनंजय माने यांनी केले.
बारामती शाखेमध्ये जागतिक महिला दिनाचे व परिचारिका दिनाचे औचित्य साधून कर्तृत्वान महिलांचा सन्मान चंदूकाका सराफ प्रा लिमिटेडचे चेअरमन किशोरकुमार शहा सर व संचालिका नेहा किशोरकुमार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. ८० वर्षाच्या लोपाबाई आगवणे, दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी प्रमोद ठोंबरे व त्यांच्या आई सिंधुताई ठोंबरे,
टाटा शोरूमचे जनरल मॅनेजर स्वप्निल भोईटे व त्यांच्या आई सुनिता भोईटे, नेक्सा शोरूमचे जनरल मॅनेजर गणेश जगताप व आई विजया जगताप, डॉ. वैशाली दडस व त्यांच्या आई शशिकला देवकाते, नुकतीच एमपीएससी पास झालेली वैष्णवी गावडे कोकणे व त्यांच्या आई आशा तानाजी गावडे, तसेच परिचारिका जयश्री पोपट मदने, कुसुम ढोले व नवगिरे उपस्थित होते.
सामाजिकतेचे भान जपले
सुवर्णपेढीचे चेअरमन किशोरकुमार शहा व नेहा शहा यांनी सांगितले की, आईला पण रोज भेटतो. पाहतो, बघतो, अनुभवतो. मात्र, अशा पद्धतीने आईचा सन्मान आपण कधीही करीत नाही. आई आपल्या मुलांना सांभाळते, जपते, वाढवते. संस्कारांचे सुसंस्करन देखील करते. निस्पृह व निस्वार्थपणे आपल्या मुलांचा सांभाळ करते.
याच गोष्टींचा आधार घेऊन सामाजिकतेचे भान जपत सुवर्णपेढीने पुढाकार घेऊन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. काळानुसार बदलत जाणाऱ्या डिझाइन्स आता फलटणमध्ये देखील नवीन शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतील, असे मत त्यांनी सांगितले.