अजमेर – निवासी डॉक्टरने ड्रिपच्या साहाय्याने स्वतःला इंजेक्शन देत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. अक्षय कुमार अंकारे असे आत्महत्या केल्याच्या डॉक्टरचे नाव आहे. मृत निवासी डॉक्टर हा मुंबईचा रहिवासी असून त्याने अजमेर येथे आत्महत्या केली आहे.
डॉ. अक्षयच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून डॉक्टरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. डॉक्टरचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. डॉक्टरने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस याचा शोध घेत आहेत.
अक्षयचे मित्र त्याला सारखे फोन करत होते. मात्र तो फोनला प्रतिसाद देत नव्हता. शेवटी काही मित्र त्याच्या घरी गेले. अक्षयच्या घराचा दरवाजा आत मधून बंद होता. पण आतमधून काहीच प्रतिसाद येत नव्हता. बराच वेळ झाल्यानंतर अक्षयच्या मित्रांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अक्षयला फोन केला. पण त्यांचाही फोन त्यानं उचलला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. पोलिसांनी अक्षयच्या खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा डॉ. अक्षय खोलीत पडला होता. सहकाऱ्यांनी त्याला तपासले असता. त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे.