मुंबई – शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत आगीची घटना समोर आली आहे. मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, लिंक रोडवरील स्टार बाजाराजवळील अंधेरी पश्चिम भागात लेव्हल २ मध्ये दुपारी साडेचार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या दुकानात ही आग लागल्याची माहिती आहे. आतापर्यंत कोणतीही जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.