हडपसर (विवेकानंद काटमोरे ,प्रतिनिधी) – महापालिका निवडणूक कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. हरकती-सूचनाही होत आहेत. तरी, अजून आरक्षण जाहीर होण्याचा एक टप्पा बाकी आहे. त्यामुळे अनेक ‘ मिस्टर ‘ अँड ‘ मिसेस’ विद्यमान व इच्छुक जोड्या तयारीला लागले असून एका प्रभागातून मिस्टर तर दुसऱ्यातून मिसेस, अशी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे ‘ मिस्टर अँड मिसेस ‘ हा खेळ आरक्षण जाहीर होईपर्यंत राहणार की त्यानंतरही, अशी चर्चा रंगलेली दिसत आहे.
आरक्षणाबाबत स्पष्टता बाकी असल्याने अजूनही आम्ही संभ्रमातच आहोत. असे काही नगरसेविका व काही नगरसेवक तसेच इच्छुक सांगत असून यासाठीच दोघांचीही तयारी सुरू केली आहे, असेही ते बोलत आहेत. हा प्रभाग तर आपला बालेकिल्लाच आहे. कोरोना काळात आणि संपूर्ण पाच वर्षे समाजात उतरून काम केले आहे. शिवाय सगळी फिल्डिंग लावून बसलोय.
तयारीत असलेल्या दाम्पत्यांची नावं….
नवीन प्रभाग क्रमांक 22 ते 46 मधून निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक दाम्पत्यांबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यात प्रभाग 22 मधून वंदना कोद्रे आणि 23 मधून डॉ.दादा कोद्रे, 23 मधून प्रशांत पवार व वर्षा पवार, 24 मधून निलेश मगर व हेमलता मगर, प्रभाग 23 व 24 मधून समीर तुपे आणि मोनिका तुपे, 25 मध्ये वैशाली बनकर व 44 मधून सुनिल बनकर, तसेच 25 प्रभागातून योगेश ससाणे आणि 44 मधून पद्मा ससाणे, प्रभाग क्रमांक 25 मधून प्रशांत सुरसे व पल्लवी सुरसे, प्रमोदनाना भानगिरे 46 आणि 44 प्रभागातून कांचन भानगिरे, प्रभाग क्रमांक 44 मधून उज्वला जंगले, सुभाष जंगले, प्रभाग 44 मधून जीवन जाधव व मनिषा जाधव, प्रभाग क्रमांक 25 मध्ये विठ्ठल विचारे आणि 44 मधून निर्मला विचारे तसेच धनराज घोगरे प्रभाग 26 व 46 मधून लक्ष्मी घोगरे आणि प्रभाग क्रमांक 44 मधून पोपटराव वाडकर व विजया वाडकर हे दाम्पत्य निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कौल आपल्या बाजूने लागला तर विजय हा निश्चितच असणार आपला, पण तरी सुद्धा कौल फिरला तर दोन्ही बाजूने लढण्याची आपण तयारी करणार आहे. इकडे बायकोला आणि शेजारच्या वॉर्डात मी लढणार आहे, असे या दाम्पत्यांकडून सांगण्यात येतेय. मात्र, आरक्षणाचा तिडा संपताच दोघांपैकी एकचजण इच्छुक राहतील, असेही दिसत आहे.