खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोना

नांदेड: नांदेडमधील भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींभोवती करोनाचा विळखा दिवसेंदिवस आढत असल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील चार आमदारांनंतर आता खासदारालाही करोना झाल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातारण झाले आहे.

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही करोना चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या पिता-पुत्रावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.

मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना करोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.