- 205 जणांना ‘डिस्चार्ज’
- 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासांत 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तसेच शनिवारी वाढलेली रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरात 259 जणांना करोनाची लागण झाली. तर 205 रुग्ण बरे झाले.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, रविवारी (दि. 4) शहरात 259 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 58 हजार 993 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 2 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 293 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 205 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 53 हजार 352 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5 हजार 435 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत याबाबत महापालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 74 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 274 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 348 इतकी आहे.