नागपूर – बिपरजॉय चक्रीवादळामुळे केरळमध्ये झालेल्या आगनानंतर मान्सूनची वाटचाल अडखळली होती. यानंतर अखेर विदर्भात मान्सून दाखल झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.