भाजप नेत्याच भर सभेत आवाहन
भंडारा : सध्या राज्यातील विधानसभेचं रणशिंग शिगेला पोहचलं असून अनेक नेतेमंडळींच्या सभानि राज्य ढवळून निघालय. मात्र या सभांच्या कालावधीत वाहतूक नियमांना हरताळ फासण्याच आवाहन स्वतः भाजप नेत्यांकडूनच करण्यात येतंय.
13 तारखेला साकोली येथे होत असलेल्या मोदीच्या सभे करिता “एका दुचाकी वाहणावर पाच लोक बसवुन आना असं आवाहन “भंडारा गोंदीयाचे पालक मंत्री तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार परिणय फुके यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल आहे. तसेच जर गाडी पकडली तर पोलिसाना सांगा मी परिणय फुके चा कार्यकर्ता आहे. ते तुमच्या हात लावणार नाहीत.
या नेत्यांच्या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे केंद्राने जे वाहतूक नियम लागू केलेत. ते फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.