पुणे बार असोसिएशन सभासद नोंदणीस सुरूवात

पुणे: वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची 2020-21 ची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. केवळ नोंदणीकृत सभासदांनाच बार असोसिएशनच्या निवडणूकीत मतदान करता येणार असून, 24 डिसेंबरपर्यंत शिवाजीनगर न्यायालयातील सेंट्रल बार रुम येथील कार्यालयात ही नोंदणी सुरू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते यांनी दिली.

ज्या वकिलांनी 10 वर्षे प्रॅक़्टीस पूर्ण केली आहे. त्यांना 50 रुपये, तर दहा वर्षापेक्षा कमी कालावधी प्रॅक्‍टीस केलेल्याला 25 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. सभासद हा पुणे शहरातील कायमस्वरूपी रहिवाशी असणे अनिवार्य आहे.

त्याबाबत कागदपुरावा म्हणून पुणे लॉयर्स कन्झुमर्स सोसायटीचे ओळखपत्र, बार कौन्सीलचे ओळखपत्र अथवा पुणे बार असोसिएशनचे ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. यासोबत पुण्यात राहत असलेला पुरावा देणे आवश्‍यक आहे.

आधार कार्ड, नोंदणीकृत लिव्ह अँड लायसेन्स करारनामा हा रहिवाशी म्हणून पुरावा चालणार असल्याचे ऍड. आगस्ते यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.