व्लदिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’च्या परिषदेच्या निमित्ताने मलेशियाचे पम्तप्रधन महाथिर मोहमद यांची भेट घेतली अणि वादग्रस्त इस्लामी व्याख्याता झकीर नाईकच्या प्रत्यार्पणाच्या मुद्दयावर चर्चा केली. दहशतवाद पसरवणे आणि मनी लॉंडरिंगच्या आरोपांखाली झकीर नाईक भारताला हवा आहे.
याबरोबरच पंतप्रधानांनी महाथिर यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यामागील तर्कही सांगितला. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांबरोबरच भविष्यकाळातील सहकार्याला विभिन्न क्षेत्रांमध्ये वाढवण्याच्या पर्यायांबाबतही यावेळी चर्चा झाली, असे मोदी यांनी सांगितले. झकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा विषय भारतासाठी महत्वाचा असून या मुद्दयावर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये यापुढे समन्वय ठेवला जाणार आहे. असे विदेशे सचिव विजय गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
टिव्हीवरील कट्टरपंथी व्याख्याता झकीर नाईक याने 2016 मध्ये भारत सोडला आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम असलेल्या मलेशियाला गेला. तेथे त्याला कायमस्वरूपी आश्रय देण्यात आला. 2016 पासून तो मनी लॉंडरिंग आणि द्वेषयुक्त भाषणाद्वारे अतिरेकी भडकावल्याप्रकरणी भारतीय अधिकाऱ्यांना हवा आहे. 8 ऑगस्ट रोजी मलेशियन हिंदू आणि चिनी लोकांवरील टीकेनंतर मलेशियातील कोणत्याही सार्वजनिक उपक्रमात सहभागी होण्यास त्याला बंदी घातली गेली आहे.