मुंबई: मोदी सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींनी खूप आश्वासने दिली. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करू मात्र सत्तेत आल्यानंतर ते आमच्या हातात नाही, असे म्हणत मोदी सरकारने हात झटकले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. मोदी सरकारने २०१४ला सत्तेत आलो तर डॉलरची किंमत ४० रुपयापेक्षा कमी करू, नंतर सत्तेत आल्यावर रुपया आंतराष्ट्रीय कारणामुळे घसरत असल्याचे कारण दिले, असे राष्टवादीने म्हटले आहे.
मोदी सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे….#KamalKaPhoolBanayeFool #ModiMatBanao #ModiFooledIndia #ModiDay #NCP2019 #LoksabhaElections2019 @narendramodi @PMOIndia @BJP4Maharashtra @BJP4India pic.twitter.com/ycgtUVp9iO
— NCP (@NCPspeaks) April 1, 2019