‘मोदी सरकारचा करोना काळातील कारभार तुघलकी’

नवी दिल्ली  – देशातील करोना स्थितीच्या हाताळणीबाबत मोदी सरकारवर देशभरातून टीका सुरू असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी हेही रोज याच विषयावरून मोदी सरकारवर ट्‌विटरच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत.


मोदी सरकारची करोना स्थिती हाताळण्याची पद्धत तऱ्हेवाईक स्वरूपाची आहे असे सूचित करताना त्यांनी म्हटले आहे की, हे सरकार तीन पद्धतीच्या धोरणाने करोना स्थिती हाताळत आहे. 1. तुघलकी लॉकडाऊन, 2. घंटी वाजवा, 3. देवाचे गुणगान करा. या आधीही राहुल गांधी यांनी मोदींच्या कारभाराची तुलना दिल्लीचा तुघलक सुलतान मोहंमद बिन तुघलक यांच्या कारकिर्दीशी केली होती. हा सुलतान वेडपट राज्यकर्ता म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा अशा उपायांनी करोना जात नसतो पण मोदींनी देशवासीयांना तेच करायला लावले आहे अशी टीकाही ते सातत्याने करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.