Stock Market Updates | निर्देशांकात किरकोळ वाढ; शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा

मुंबई – करोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे व्यापारावर व जागतीक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. काही गुंतवणूकदार सध्याच्या कमी पातळीवरील शेअरची खरेदी करीत आहेत तर काही परिस्थिती यापेक्षा बिघडेल म्हणून विक्री करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा चालू आहेत. अशा अवस्थेमध्ये शेअर बाजार निर्देशांक आज थोडीफार वाढ होऊ शकली.

बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 28 अंकांनी वाढून 48,832 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 36 अंकांनी म्हणजे पाव टक्‍क्‍यांनी वाढून 14,617 अंकांवर बंद झाला.

आज झालेल्या खरेदीचा फायदा एशियन पेंट्‌स या कंपनीला सर्वात जास्त होऊन या कंपनीच्या शेअरचे भाव 2 टक्‍क्‍यांनी वाढले. त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी, सनफार्मा टेक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.

मात्र आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. करोनाव्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रोज दोन लाख रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामकाजावर आणि नफ्यावर परिणाम होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.

महाराष्ट्र दिल्ली यासारख्या औद्योगिक दृष्टया प्रगत राज्यांनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून लॉकडाउन ऐवजी कडक निर्बंध जारी केले आहेत. मात्र इतर राज्यातून परिस्थिती फारच बिघडत चालल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत. आशिया, युरोप आणि अमेरिकन शेअर बाजारात कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा अवस्थेतही क्रुडचे दर वाढत आहेत. आज क्रुडचा दर 67.21 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.