चेन्नई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करून आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर एक दिवसानंतर द्रमुक पक्षाने आमदार के के सेल्वम याना पक्षातून निलंबित केले. तसेच त्यांच्याकडे असलेले पदे देखील काढून घेतले. आणि कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “द्रमुकचे मुख्यालय कार्यालय सचिव आणि कार्यकारी समिती सदस्य के के सेल्वम यांना आजपासून पक्षातून निलंबित केले आहे.” सेल्वम यांनी पक्षाची शिस्त, प्रतिष्ठा भंग केल्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे पक्षाध्यक्ष म्हणाले. तसेच त्यांना जाब सुद्धा विचारण्यात आला आहे.
थाउजेंड लाइट्स विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे सेल्वम यांनी मंगळवारी दिल्ली दौर्यावेळी मोदींच्या सुशासनसाठी कौतुक केले आणि अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. भाजप पक्षात सामील होण्याच्या अफवांना त्यांनी फेटाळून लावले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली आणि आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी केल्याचे सेल्वम म्हणाले.
सेल्वम यांनी संधीचा फायदा उठविला आणि नड्डा यांची भेट घेतली आणि रामेश्वरम आणि भगवान राम यांच्याशी जोडलेली अन्य स्थाने अयोध्याप्रमाणे विकसित करण्याची विनंती केल्याचे सेल्वम म्हणाले.