पूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत

पूरग्रस्त भागात महिन्याभर पुरेल एवढा किराणा आणि अन्नधान्य वाटप

पुणे – जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोकण कोल्हापूर सांगली महाराष्ट्रातील अनेक भागात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरेदारे पाण्याखाली गेली. पडली अनेक ठिकाणी जीवितहानी झाली.

अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. महापुरामुळे संकटात सापडलेल्या आपल्या कोकणातील बांधवाना संकटातून सावरण्यासाठी जगण्याचे बळ देण्यासाठी आवाहन वडगावशेरीचे आमदार सुनिलअण्णा टिंगरे यांनी केले आहे.

यांनी कोकणवासियाच्या मदतीसाठी ३००० कुटुंबासाठी महिन्याभर पुरेल एवढा किराणा अन्नधान्य व ज्यांच्या घरातली भांडीकुंडी पुरामुळे वाहून गेली आहे अशा २००० कुटुंबासाठी संसार उपयोगी भांडी कोकणातील पूरग्रस्त भागात वाटप करण्यात येणार आहेत.

वडगांवशेरीतील नागरिकांनी सढळ हाताने पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.