मुंबई :- कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आयपीएलमधून माघार घेतली होती. आता 9 वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. त्याने स्वतःच याबात घोषणा केली आहे. गेल्यावर्षी त्याने या स्पर्धेतून माघार घेतली होती. यंदा मात्र, त्याने याबाबत आपण सज्ज असल्याचे सांगितले आहे.
आयपीएल स्पर्धेचा पुढील मोसमापूर्वीचा लिलाव येत्या वर्षाअखेरीस होणार आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडीज व अमेरिकेत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्याची तयारी म्हणून स्टार्कने हा निर्णय घेतला आहे.
स्टार्कसह ऑस्ट्रेलियाचे आणखीही काही खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. मात्र, डेव्हीड वॉर्नरने पुढील वर्षी आयपीएल खेळण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.
दरम्यान, डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आतापर्यंत 27 आयपीएल सामन्यात खेळला. त्याने 7.17 च्या इकॉनॉमीच्या रेटने 34 गडी बाद केले. 15 धावा देत 4 गडी बाद करणं हा त्याची सर्वोत्तम खेळी आहे.